मनोरंजनातून विज्ञानाचा प्रसार
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क ः विज्ञान प्रेमींसह बालचमूंसाठी हक्काचे ठिकाण

मनोरंजनातून विज्ञानाचा प्रसार पिंपरी चिंचवड सायन्स पार्क ः विज्ञान प्रेमींसह बालचमूंसाठी हक्काचे ठिकाण

---------------------------------------------------------
पिंपरी, ता. ४ : अश्मयुगापासून आजच्या संगणक युगापर्यंतचे अनेक वैज्ञानिक शोध कसे लागले, त्यामागील कारण मीमांसा हसत-खेळत समजून घेण्याचे ठिकाण म्हणजे ‘पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क’ झाले आहे. त्यामुळेच, विज्ञानप्रेमींसह बालचमूंचे हक्काचे ठिकाण आहे. सध्या उन्हाळी सुटी लागल्याने अनेक पालक आपल्या पाल्यांना विज्ञानयुगाची सफर सायन्स पार्कच्या माध्यमातून घडवत आहे.

काय पाहाल ‘सायन्सपार्क’मध्ये...
-------------------------
सुमारे ७ एकर क्षेत्रफळावर सायन्स पार्कचा विस्तार आहे. विज्ञानातील अनेक शोध, संदर्भ इमारतीमधील एकूण चार दालनांमध्ये प्रदर्शन स्वरूपात आहेत. तर, खुल्या उद्यानामध्ये विज्ञानाची तत्त्वे उलगडणारी खेळणी ठेवली आहेत. इमारतीमध्ये वाहनांची संपूर्ण माहिती देणारे ऑटोमोबाइल दालन, वातावरणीय बदलांची माहिती देणारे हवामान परिवर्तन दालन, मनोरंजक विज्ञान, ऊर्जा दालनासह ‘उडी सायन्स शो’ व तारामंडल शो सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी विज्ञानातील अनेक मूलभूत शोध त्यांच्या माहितीसह प्रतिकृती स्वरूपात पहावयास मिळतात.

नव्याने सुरु झालेले उपक्रम
सायन्सपार्कमध्ये डायनो पार्क, विज्ञान उद्यान लहान मुलांचे आकर्षण केंद्र आहे. ऑटोमोबाईल दालन, ऊर्जा दालन, हवामान परिवर्तन दालन हे नव्याने सुरु झालेले आहे. या उद्यानातील भारतीय वैज्ञानिकांचे बसवण्यात आलेले अर्धाकृती पुतळे पाहून व त्यांच्या विषयीची माहिती वाचून लहान मुलांना प्रोत्साहन मिळते. याशिवाय आकाश दर्शन, विविध विज्ञान व्याख्याने, विज्ञान प्रात्यक्षिक कट्टा, उन्हाळी सुटीतील विज्ञान शिबिरे असे अनेक उपक्रम सातत्यपूर्वक या ठिकाणी चालू आहेत. उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर सायन्सपार्कमध्ये शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सायंकाळी साडेसहापर्यंत वेळ वाढवली आहे. तसेच, सोमवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात आले आहे. याचबरोबर उन्हाळी सुटीमध्ये खगोल विज्ञान, भौतिक, रसायन व जीवशास्त्र या विषयांवर मनोरंजक विज्ञान शिबिरांचेही आयोजन केले आहे. विज्ञानाचा वारसा जपणाऱ्या या वारसास्थळाला प्रत्येक पालक पाल्यासोबत आवर्जून भेट देत आहे.

सध्या सुरु असलेले उपक्रम -

१. खगोल विज्ञान कार्यशाळा
ता. ६ मे २०२३
वेळ- सकाळी ११ ते सायं.८
प्रवेश पात्रता : पाचवी ते अकरावी

२. मूलभूत भौतिक व रसायनशास्त्र कार्यशाळा
ता. १३ मे २०२३
वेळ सकाळी १० ते सायंकाळी पाच.
प्रवेश पात्रता : पाचवी ते अकरावी

३. रोबोटिक्स कार्यशाळा
ता. १४ मे २०२३
वेळ सकाळी १० ते सायंकाळी पाच
प्रवेश पात्रता : दुसरी ते चौथी- लहान गट, पाचवी ते दहावी- मोठा गट

४. कृतिशील विज्ञान कार्यशाळा
ता. २१ मे २०२३
वेळ सकाळी १० ते सायंकाळी पाच.
प्रवेश पात्रता : पाचवी ते अकरावी

--
शतकपूर्ती व्याख्यान आणि सुगम संगीत उपक्रम राबविले. सीएसआरच्या माध्यमातून एक गॅलरी, फन सायन्स, एनर्जी आणि ॲटो मोबाईल प्रमाणे पीपीपी तत्वावर ग्लोबल वॉर्मिंगवर गॅलरी
करीत आहोत. विज्ञानयुक्त खेळणी पाच हजार स्वेअर फूट जागेत ठेवणार आहोत.
- प्रवीण तुपे, संचालक, सायन्स पार्क

फोटोः 40906, 40928

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com