दिवंगत ज्येष्ठ नागरिकांची नावे विरंगुळा केंद्राला द्या ः काळभोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवंगत ज्येष्ठ नागरिकांची नावे 
विरंगुळा केंद्राला द्या ः काळभोर
दिवंगत ज्येष्ठ नागरिकांची नावे विरंगुळा केंद्राला द्या ः काळभोर

दिवंगत ज्येष्ठ नागरिकांची नावे विरंगुळा केंद्राला द्या ः काळभोर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : शिवसेना कार्यकर्ते कै. प्रवीण काशिनाथ खिलारे व सीताराम धोंडू रहाटे यांचे नाव निगडी येथील यमुनानगर स्कीम नंबर २१ मधील सद्गुरू दत्त उद्यान येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला देण्याची मागणी आयुक्तांकडे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाकडून नामांतराच्या सभेमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी सभेमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारतीला दुसऱ्या व्यक्तीची नावे देण्याची मागणी इतर नगरसेवकांनी केली होती. परंतु, आता नागरिकांना ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र लवकरात लवकर उपलब्ध व्हावे. एक ते दीड वर्ष झाले असून फक्त विरोधाला विरोध धोरण ठेऊन प्रस्ताव मान्य असूनही नागरिकांना वेठीस धरले जात आहे.