Sat, Sept 30, 2023

गंगा स्काईज ज्येष्ठ नागरिक संघाचा
आठवा वर्धापनदिन उत्साहात
गंगा स्काईज ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापनदिन उत्साहात
Published on : 5 May 2023, 2:45 am
पिंपरी, ता. ५ ः वल्लभनगर येथील गंगा स्काईज ज्येष्ठ नागरिक संघाचा आठवा वर्धापनदिन उत्साहात झाला. २५ सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा श्रीफळ, शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ अध्यक्षस्थानी होत्या. माजी महापौर योगेश बहल, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र होनराव, महासंघाचे माजी अध्यक्ष अरुण बागडे, संघाच्या अध्यक्ष सुमन वाघमारे आदी उपस्थित होते. विनोद कडू यांनी रामायणाचे कवडसे विषयावर व्याख्यान दिले. स्वरांजली मराठी-हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला. प्रकाश ब्राह्मणकर, सुनंदा ढवळे, निवृत्ती यादव, काशिनाथ लगड, दिलीप गोडसे यांनी संयोजन केले. सचिव दत्तात्रेय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. रामभाऊ कचरे यांनी आभार मानले.