भोसरीत तडीपार गुंडाला अटक

भोसरीत तडीपार गुंडाला अटक

पिंपरी, ता. ५ : तडीपार असूनही शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या गुंडाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (ता. ४) सायंकाळी सातच्या सुमारास भोसरीतील फुलेनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली. चन्नाप्पा परशुराम सुतार (वय २२, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सुतार याला पोलिसांनी पाच ऑगस्ट २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात वावरत होता. या बाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला तलवारीसह अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.


रेल्वेची चाकांच्या विक्री करून अपहार
पिंपरी, ता. ५ : आसाम येथे पोचविण्यासाठी दिलेली रेल्वेची चार चाकांची परस्पर विक्री करून एकाने १४ लाखांचा अपहार केला. हा प्रकार १८ ते २५ एप्रिल या कालावधीत एचवायटी इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड एमआयडीसी भोसरी येथे घडला. अशोक उदयनारायण सिंग (वय ४३, रा. रावेत) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामेश्वर ओखा चव्हाण (वय ४०, रा. सांगवी, ता. चाळीसगाव, जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अशोक सिंग यांनी आरोपी चव्हाण याच्याकडे आसाममधील दिब्रुगड येथे पोचविण्यासाठी रेल्वेच्या चाकाचे चार सेट दिले. आरोपीने चाकांची परस्पर विक्री करून अपहार केला. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com