लोकराजाला स्तब्ध राहून 
कष्टकऱ्यांकडून आदरांजली

लोकराजाला स्तब्ध राहून कष्टकऱ्यांकडून आदरांजली

पिंपरी, ता. ६ ः लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व, स्मृती शताब्दी वर्ष सांगताच्या निमित्ताने कष्टकरी संघर्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्यावतीने आज १०१ व्या स्मृतिदिनानिमित्त १०१ सेकंद स्तब्ध राहून, लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, बालाजी लोखंडे, सलीम डांगे, सुनीता पोतदार, कलावती पाल, सुमन गायकवाड, जयश्री सोनगिरे, अजय कारंडे, प्रकाश देविकिरी, राजू बिराजदार, संजय भांगे, महादेव गिरीसागर, सागर ठोंबरे, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराज यांनी राजेशाहीचा थाट लोकांवर लादला नाही, ते राजाप्रमाणे आयुष्य आरामात जगले नाहीत तर सर्व क्षेत्रांमध्ये जाऊन तेथील लोकांमध्ये रममाण होऊन, तेथील लोकांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली.’’

मराठा सेवा संघातर्फे अभिवादन
मराठा सेवा संघाच्यावतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या चिंचवड -एस. बी. चौक, दसरा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशफाक शेख, एस. ओव्हाळ, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे, सेवा संघाचे अध्यक्ष सुधीर कांबळे यांच्यासह मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

फोटोः 41346

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com