गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांचा आधार शहरात २४९ दुकाने ः केवळ १ लाख ४४ हजार जणांना मोफत लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांचा आधार 
शहरात २४९ दुकाने ः केवळ १ लाख ४४ हजार जणांना मोफत लाभ
गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांचा आधार शहरात २४९ दुकाने ः केवळ १ लाख ४४ हजार जणांना मोफत लाभ

गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांचा आधार शहरात २४९ दुकाने ः केवळ १ लाख ४४ हजार जणांना मोफत लाभ

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : महागाईच्या झळा सोसत असताना आता शिधा पत्रिकावरील धान्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले असून, किराणा, दूध आणि भाजीपालाही खरेदी करणे गोरगरिबांना परवडत नाही. अशा कठीण परिस्थितीत शिधा पत्रिकेवरील स्वस्त धान्याचा आधार केवळ नागरिकांना उरला आहे. सध्या मोफत ऑनलाइन धान्याचा लाभ १ लाख ४४ हजार ६६१ जणांना नाममात्र मिळत आहे. मात्र, महागाईच्या झळा सोसत असलेल्या दारिद्र्यरेषेवरील (एपीएल धारक) गरजूंनाही रास्त भावाने धान्य मिळण्याची गरज असल्याची भावना प्रकर्षाने समोर आली आहे.
शहराची लोकसंख्या ३० लाखाच्यावर गेली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाची शहरात पिंपरी (ज विभाग), चिंचवड (अ विभाग) व भोसरी ( फ विभाग) कार्यालये कार्यरत आहेत. सध्या एकूण २४९ रास्त धान्य दुकाने शहरात आहेत. बरीच दुकाने कोविड काळानंतर बंद झालेली आहेत. सध्या पिंपरी व चिंचवडमधील अंत्योदय शिधापत्रिका धारकांची संख्या २१८४५ आहे. तर, प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या सध्या ७६०८८ आहे. भोसरी फ विभागाअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ४६७२८ आहे. एका दुकानदाराकडे सुमारे ३०० ते १००० स्वस्त धान्याचे लाभार्थी आहेत. ज्यांचे उत्पन्न ५९ हजारांवर आहे. त्यांना लाभ बंद झाला आहे. तर, ५९ हजाराच्याआतील धारकांना केवळ हा लाभ मिळत आहे.

प्रत्येकी व्यक्तीला महिन्याकाठी सध्या ३ किलो तांदूळ व २ किलो गहू मोफत भावाने मिळत आहे. नागरिकांना स्वस्त धान्याचा लाभ हा ५ ते १५ तारखेपर्यंत कमी-जास्त फरकांच्या दिवसाने मिळत आहे. ऑनलाइन धान्याची नोंद झाल्यानंतर धान्य वाटपाची कार्यवाही दर महिन्याला किमान ३ ते ५ तारखेपर्यंत सुरु होत आहे. त्याशिवाय, १०० रुपयांत आनंद शिधा वाटप नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याचा लाभ २ लाख ८६ हजार ६७३ लाभार्थ्यांना मिळाला आहे. प्रत्येकी १ किलो रवा, पामतेल व साखर व डाळीचे वाटप या माध्यमातून करण्यात आले आहे. त्याशिवाय १ किलो साखरदेखील मिळत होती. ती देखील बंद झाली आहे. त्यामुळे, सध्या इतर कोणतीही मोफत तसेच, सवलतीमधील योजनेचा लाभ नागरिकांना मिळत नसल्याने नागरिकांची रास्त धान्याविषयीची नाराजी आहे.
--
अंत्योदय लाभार्थी
अ झोन : २०५  
ज झोन : २१६४०
--
प्राधान्य कुटुंब लाभार्थी
अ झोन : ४११०४
ज झोन : ३४९८४
--
भोसरी फ विभाग एकूण लाभार्थी : ४६७२८
--
रास्त धान्य दुकानदार
अ : ९०
ज : ७७
फ : ८२
---
दर महिन्याला प्रती माणसी किती धान्य मिळते याची माहिती आम्हाला नाही. त्या धान्याची पावती आम्हाला मिळत नाही. धान्य वितरणात तफावत दिसून येते. आमच्या हक्काचे धान्य आम्हाला समजायला हवे. प्रती माणसी १२०० ग्रॅम धान्य आम्हाला ऑनलाइन मिळत आहे. कुटुंबातील पाच जणांना मिळून एकूण गहू आणि तांदूळ १२ किलो धान्य मिळत आहे. आमचे इतर धान्य हक्काचे जाते कोठे हे माहीत असायला हवे. दरवेळी धान्य घेताना दुकानात गर्दी प्रचंड असते.
- एक ग्राहक, निगडी
--
रास्त धान्याचे लाभार्थी दिवसेंदिवस वाढले आहेत. इतर योजना बंद आहेत. आनंद शिधा वाटप पूर्ण झाले आहे.
- नागनाथ भोसले, फ विभागीय परिमंडळ कार्यालय, भोसरी
--
सध्या महागाई प्रचंड आहे. नागरिकांना बाहेरून धान्य घेणे परवडत नाही. १ लाख २० हजार धारक हा केवळ ऑनलाइन असलेला
लाभार्थी सध्य स्थितीत आहे. बाकी ऑफलाइन असलेल्या एपीएलमधील नागरिकांना पुरवठा शासनाने करावा. त्यांना धान्य फुकट न देता शासकीय दराने धान्य द्यायला हवे. अन्यथा नागरिक अडचणीत येतील. सरकारने त्यांना नोंदणीकृत करून घ्यावे.
- विजय गुप्ता, खजिनदार, महाराष्ट्र शॉपकिपर फेडरेशन
--