मावळ नागरी सहकारी पतसंस्थेत 
गैरव्यवहार नाही ः लोकायुक्त
खांडगे यांची माहिती; बदनामी करणारांवर गुन्हे

मावळ नागरी सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार नाही ः लोकायुक्त खांडगे यांची माहिती; बदनामी करणारांवर गुन्हे

तळेगाव दाभाडे, ता. ७ ः मावळ नागरी सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत नितीन बाळशिराम गुंजाळ यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर राज्याचे लोकायुक्त न्या. व्ही. एम. कानडे यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली. मुदतबाह्य कालावधीत तक्रार केली असून, सहकारी सोसायटी विभागाचे अतिरिक्त निबंधक ज्ञानेश्वर मुकने यांच्या लेखापरीक्षण अहवालानुसार पतसंस्थेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा निकाल देत लोकायुक्तांनी तक्रारदाराची कानउघाडणी केली.
लोकायुक्तांच्या निर्णयाबाबत माहिती देताना, पतसंस्थेचे सचिव संतोष खांडगे, विशेष कार्य अधिकारी एस. बी. देशमुख आणि कायदेशीर सल्लागार ॲड. विनय दाभाडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याची अफवा पसरवून बदनामी करणारे नितीन गुंजाळ आणि अनिल मराठे यांच्या विरोधात पतसंस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय देशमुख आणि वसुली अधिकारी प्रकाश वाळुंजकर यांनी फिर्यादी दिली आहे. त्यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, असे खांडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘श्रमजीवी सहकार्य हेच आमचे ध्येय’ असे आमचे ब्रीद आहे. त्याला साजेसा लौकिक आम्ही जपला आहे. मात्र, कर्ज बुडावण्याच्या हेतूने काही थकबाकीदारांनी संस्थेची नाहक बदनामी केली. बदनामी करणाऱ्या आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात पतसंस्था कडक धोरण राबविणार आहे.’’ अशा अपप्रचाराला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन खांडगे यांनी केले आहे.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com