
डॉ. नं. म. जोशी यांना जीवनसाधना पुरस्कार
पिंपरी, ता. ९ ः महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार वितरण झाले. त्यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. नं. म. जोशी यांना जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, मसापचे उपाध्यक्ष राजीव बर्वे, शाखाध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ आदी उपस्थित होते. गाडगीळ यांनी डॉ. न. म. जोशी यांची साहित्यिक कारकिर्दीवर आधारित मुलाखत घेतली. किरण लाखे, संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
पुरस्कार पुढीलप्रमाणे ः कादंबरी ः डॉ. स्मिता दातार मुंबई (फक्त ‘ती’च्या साठी), शीतल देशमुख-डहाके यवतमाळ (व्हेन माय फादर); ललित ः धनश्री लेले ठाणे (अलगद), नंदकुमार मुरडे पुणे (दस्तऐवज शब्दांचा); कथा ः दत्तात्रय सैतवडेकर मुंबई (ब्रेकींग न्यूज), रमेश पिंजरकर पुणे (अरण्य-रुदन); कविता ः शशिकांत हिंगोणेकर जळगाव (युद्धरत), विलास गावडे पनवेल (देशाचं महानिर्वाण); बालसाहित्य ः विनोद पंचभाई पुणे (हे खरे जगज्जेते), मुऱ्हारी कराड लातूर (नव्या जगाची मुले), रमेश वंसकर गोवा (आइस्क्रीमचं तळं).