‘कार्यक्षेत्राला योगदान देणारे करिअर करा’ ः प्रा. विजय नवले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कार्यक्षेत्राला योगदान देणारे करिअर करा’ ः प्रा. विजय नवले.
‘कार्यक्षेत्राला योगदान देणारे करिअर करा’ ः प्रा. विजय नवले.

‘कार्यक्षेत्राला योगदान देणारे करिअर करा’ ः प्रा. विजय नवले.

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ९ : आवड, क्षमता, पात्रता ही करिअरची त्रिसूत्री असून करिअर हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. कार्यक्षेत्राला योगदान देणारे करिअर करा, असे प्रतिपादन करिअर सेवा डॉटकॉमचे संचालक प्रा. विजय नवले यांनी केले. रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, मावळ नागरी सहकारी पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला करिअर घडवूया, दहावी-बारावीनंतर पुढे काय’ या विषयावर प्रा. नवले व्याख्यान देत होते. यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, विन्सेंट सालेर, लक्ष्मण मखर, देवराम पारिठे, सोनबा गोपाळे, दशरथ जांभूळकर, मिलिंद शेलार, सुदाम दाभाडे, विलास टकले, पांडुरंग पोटे, शमशाद शेख, रेणू शर्मा, सुनील खोल्लम, श्रीनिवास गजेंद्रगडकर, सोपान असवले, संजय वंजारे, संतोष मालपोटे, संदीप मगर, उपस्थित होते. संतोष खांडगे व मान्यवरांच्या हस्ते प्रा. नवले यांचा सत्कार करण्यात आला. संतोष खांडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सत्यजित खांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी व गणेश ठोंबरे यांनी केले. लक्ष्मण मखर यांनी आभार मानले.