शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके

शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके

पिंपरी, ता. ९ ः महापालिकेच्या शाळांमधील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठीच्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी मान्यता दिली. ‘बालभारती’कडून ९९ हजार ३९१ विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके घेतली जाणार आहेत.
महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण व स्थायी समितीची साप्ताहिक सभा मंगळवारी झाली. या दोन्ही सभांची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजुरी दिली. महापालिका मुख्य प्रशासकीय भवनाच बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील शाळा १३ जूनपासून सुरू होत आहेत. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. त्यातील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके दिली जातात. यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, असे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चास मान्यता देण्यात आली. क्रमिक पाठ्यपुस्तकांची खरेदी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती यांच्याकडून केली जाणार आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम बालभारतीला देण्यासही मान्यता देण्यात आली. ‘क’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांची यांत्रिकी पद्धतीने व मनुष्यबळाद्वारे दैनंदिन साफसफाई, देखभाल व किरकोळ दुरुस्ती करणे; धर्मराजनगर चिखली येथील रस्ता रुंदीकरणात येणारी विद्युत खांब व फीडर पिलर स्थलांतरीत करण्यासाठी महावितरणला शुल्क देण्यासही मान्यता दिली.

विद्यार्थ्यांना मोफत बसपास
महापालिकेसह शहरातील खासगी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी पीएमपीचा मोफत बस प्रवास पास योजना राबविण्यात येते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातही ही योजना राबविण्यास आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

अन्य मंजूर विषय
- निगडी-प्राधिकरणातील पावसाळी गटर्स, स्टॉर्म वॉटर व पदपथांची कामे
- महापालिका संगणक यंत्रणा देखभाल-दुरुस्ती
- कुदळवाडीतील नविन शाळा इमारतीच फर्निचर व अन्य कामे
- प्राधिकरणातील स्वच्छतागृहांचे नूतनीकरण
- थेरगाव येथील शिलाई केंद्र चालविणाऱ्या बचत गटाला अनुदान देणे
- ग प्रभागातील स्मशानभूमीत गॅस दाहिनीसाठी एलपीजी गॅस जोड देणे

महापालिका शाळेतील
माध्यमनिहाय विद्यार्थी
(इयत्ता पहिला ते आठवी)
माध्यम / विद्यार्थी
मराठी / ८५७४२
हिंदी / २९४०
इंग्रजी / ६५७७
उर्दू / ४१३२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com