गदिमा नाट्यगृहासह सर्व प्रकल्प खुले करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गदिमा नाट्यगृहासह
सर्व प्रकल्प खुले करा
गदिमा नाट्यगृहासह सर्व प्रकल्प खुले करा

गदिमा नाट्यगृहासह सर्व प्रकल्प खुले करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः उभारणी होऊनही केवळ उद्‍घाटनांअभावी पडून असलेले प्रकल्प तातडीने सुरू करावेत, अशी मागणी सिटीझन फॉर पिंपरी-चिंचवड संघटनेने महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली. यात चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प १०० टक्के कार्यान्वित करावा, प्राधिकणातील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, सायन्सपार्कमधील तारांगण या प्रकल्पांचा समावेश आहे. महापालिकेने लोकांच्या हितासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्रकल्प उभारलेले आहेत. केवळ राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत ते धूळखात पडून आहेत. चिखली प्रकल्पातील पाणी मिळत नाही. माडगुळकर नाट्यगृह शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे आहे. सायन्स पार्कमधील तारांगण प्रकल्प मानाचा तुरा ठरणार आहे, त्यामुळे हे प्रकल्प खुले करावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेचे सूर्यकांत मुथियान, राजीव भावसार, ऋषिकेश तपशालकर यांच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
--