कमलेश राक्षे यांना गौरव सामाजिक कार्याचा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमलेश राक्षे यांना
गौरव सामाजिक कार्याचा पुरस्कार
कमलेश राक्षे यांना गौरव सामाजिक कार्याचा पुरस्कार

कमलेश राक्षे यांना गौरव सामाजिक कार्याचा पुरस्कार

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १० ः सामाजिक कार्यकर्ते कमलेश राक्षे यांना गौरव सामाजिक कार्याचा या पुरस्काराने राज्यपाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कमलेश यांचे बालपणीच आईचे छत्र हरपल्यानंतर त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी नोकरी व त्यानंतर व्यवसायाचा मार्ग निवडावा लागला. या व्यवसायातून प्रगती झाल्यानंतर कमलेश राक्षे यांनी स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक कार्याला सुरुवात केली. आपल्या सारखी वेळ कोणावर आली तर त्याला मदतीचा हात द्यावा हा उपक्रम त्यांनी ग्रामीण भागात प्रथम सुरु केला होता, त्यांच्या या उपक्रमाची अनेकांना मदत झाली.

समाजातील सर्व गरजू घटकांना मदत मिळावी यासाठी त्यांनी महाराष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशन व कमलेश राक्षे सोशल फाउंडेशन या दोन अधिकृत संस्थांची स्थापना केली. संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजूंना मदत करण्याबरोबर शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थींना मिळवून देणे हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत नव महाराष्ट्र व नवभारत माध्यम समुहाच्यावतीने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर उपस्थित होते.

Smt10Sf1.