Tue, Sept 26, 2023

वंचित बहुजन आघाडीकडून
सामाजिक न्याय दिन साजरा
वंचित बहुजन आघाडीकडून सामाजिक न्याय दिन साजरा
Published on : 10 May 2023, 12:57 pm
पिंपरी, ता. १० ः वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक विजय नवगिरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच सामाजिक उपक्रम म्हणून ‘प्रबुद्ध भारत’चे २०२३ चे ‘कॅलेंडर’ वाटप तसेच ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ हे पुस्तक देखील वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर महासचिव संजय ठोंबे, माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड, उपाध्यक्ष प्रीतम कांबळे, शहर कार्यकारिणी सदस्य शशिकुमार टोपेमसुरे,गजानन आखाडे आदी उपस्थित होते.
फोटो ः 42098