निवृत्तीधारकांना वाढीव पेन्शन लवकर मिळेल

निवृत्तीधारकांना वाढीव पेन्शन लवकर मिळेल

पिंपरी, ता. ११ : टाटा मोटर्स ही कामगार कल्याण, कामगार स्नेही संस्कृती असलेली कंपनी आहे. मात्र, पुणे, पिंपरी येथील संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही संपर्क किंवा सहाय्यभूत व्यवस्था केली नसल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना संघटित करून सवोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर २०२२ वाढीव पेन्शच्या निकालाची माहिती आम्ही मेळाव्याद्वारे देत आहोत. सर्व निवृत्त कामगारांना वाढीव पेन्शन लवकर मिळेल, असा विश्वास टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी प्रतिनिधी प्रशांत पोमण यांनी व्यक्त केला.
पोमण म्हणाले, ‘‘निवृत्त कामगारांनी कोणती कागदपत्रे सादर केली पाहिजेत, कुठे अर्ज केले पाहिजेत, याचे मार्गदर्शन विविध मेळाव्यामध्ये देत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये वाढीव पेन्शनला हरकती घेणाऱ्या केंद्र सरकार, ईपीएफओ, पीएफ ट्रस्ट असलेल्या कंपन्यांच्या याचिका फेटाळून २०१४ चा निकाल कायम ठेवला. खंडपीठाने २०१४ च्या योजनेतील अट रद्द केली की कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांपेक्षा जास्त पगारावर १.१६ टक्के अतिरिक्त योगदान द्यावे लागेल. मात्र, निकालाचा हा भाग सहा महिन्यांसाठी स्थगित ठेवला जाईल. जेणेकरून अधिकाऱ्यांना व ट्रस्टीच्या विश्वस्तांना त्यांचे योगदान ईपीएफ कडे जमा करता येईल असे आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे २०१६ पासून वाढीव पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या टाटा मोटर्सच्या कामगारांना कंपनी व्यवस्थापन, ट्रस्टी, विद्यमान युनियन विशेष माहिती सेवा केंद्र उपलब्ध करून देतील ही अपेक्षा कामगारांंची होती.
मेळाव्याचे अध्यक्ष, माजी उपमहापौर केशव घोळवे म्हणाले, ‘‘ऑइल इंडियासारख्या पीएफ ट्रस्ट असलेल्या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अनुसरून त्यांच्या निवृत्त कामगारांना वाढीव पेन्शन मिळण्यासाठी अधिकृत कार्यवाही सुरू केली आहे. बजाज ऑटो, किर्लोस्कर आदी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कंपन्यांनी त्यांच्या निवृत्त कामगारांचा डेटा व एकूण योगदान व नियोक्ता म्हणून जी जबाबदारी त्यांनी ‘ईपीएफओ’ला दिली आहे. १९९५ च्या कायद्यानुसार ज्या कंपन्यांनी पीएफ ट्रस्टमार्फत योगदान जमा केले आहे, त्यांनी वाढीव पेन्शन स्वतःहून दिले पाहिजे. जसे की ऑइल इंडियाने केले.
मेळाव्याचे नियोजन श्यामकांत भवरिया, संतोष लुनिया, मधू पगार, विलास कवळेकर, अनंत पवार, झेवियर, साहेबराव बच्छाव, वसंत मोटे, सुनील पाटील, मनोज चिंचवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. विद्याधर बावडेकर, जयंत पटवर्धन, प्रशांत पोमाण यांच्या नेतृत्वाखाली निवृत्त टाटा मोटर्सच्या कामगारांसाठी ही समिती २०१६ पासून कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com