भेसळयुक्त पनीर
चिंचवडमध्ये जप्त

भेसळयुक्त पनीर चिंचवडमध्ये जप्त

पिंपरी, ता. ११ : चिंचवडमधील महाराष्ट्र मिल्क डेअरी या कारखान्यातून पोलिसांनी ५४६ किलो भेसळयुक्त पनीर तसेच पनीर बनविण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
साजिद मुस्तफा शेख (वय- ३२, रा. पडवळनगर, थेरगाव), जावेद मुस्तफा शेख (वय ३८), कामगार राकेश श्रीबुद्धराम सिंग (वय २६), अल्ताफ हजरतद्दीन शेख (वय २७), अभिषेककुमार योगेशबाबू यादव (वय २२), सर्फराज शराफतउल्ला शेख (३५, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलिस नाईक आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, चिंचवड येथील महाराष्ट्र मिल्क डेअरीत भेसळयुक्त पनीर बनवले जात आहे. त्यानुसार, पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना घेऊन छापा टाकला. पोलिसांनी आरोपींकडून पनीर तयार करण्यासाठी वापरत असलेले १४० लिटर ॲसिटिक ॲसिड, ६० लिटर आरबीडी पामोलिन तेल, २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट, ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, ५४६ किलो भेसळयुक्त पनीर असा एकूण चार लाख ६७ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com