Mon, Sept 25, 2023

सामाजिक कार्यकर्त्यांकडून
माहेर अनाथालयाला मदत
सामाजिक कार्यकर्त्यांकडून माहेर अनाथालयाला मदत
Published on : 12 May 2023, 9:49 am
पिंपरी, ता. १२ ः आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते आपण दिले पाहिजे, या उदात्त भावनेतून नवी सांगवीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून ‘माहेर’ संस्थेत रोख रक्कम, धान्य व आंबे भेट देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर लिंगाडे गुरुजी यांच्या हस्ते माहेरच्या संस्थापिका लुसी कुरियन यांच्याकडे सर्व साहित्य व आंब्याच्या पेट्या सुपूर्द केल्या. संस्थेच्या अध्यक्षा हीरा बेगम मुल्ला, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद तालीकोटी, सत्यनारायण राठी उपस्थित होते. सुभाषचंद्र शिंदे यांनी आंब्याच्या पंधरा पेट्या दिल्या. चंदू केदार यांनी ५० किलो साखर दिली.