Sun, Sept 24, 2023

सहायक शिक्षण उपसंचालक
--------------------
संजय नाईकडे यांच्याकडे
अतिरिक्त कार्यभार
सहायक शिक्षण उपसंचालक -------------------- संजय नाईकडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
Published on : 12 May 2023, 1:27 am
पिंपरी, ता. १२ : पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिका प्राथमिक विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांच्याकडे सोपविला आहे.
शिक्षक उपसंचालक कार्यालयाच्या सहायक संचालक मीना शेंडकर अर्जित रजेवर गेल्या आहेत. त्यांच्या रजा कालावधीत नाईकडे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत हा पदभार सोपविण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांच्या मूळ पदाचा कार्यभार सांभाळून सहाय्यक संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ सांभाळण्याचे त्यांना सांगितले आहे. याबाबतचा तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आदेश शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिले आहेत.