‘आरटीई’च्या प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ 
प्रवेशनिश्‍चितीबाबत पालक चिंतेत, आता २२ मे पर्यंत मुदत 
तिसऱ्यांदा मुदतवाढ

‘आरटीई’च्या प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ प्रवेशनिश्‍चितीबाबत पालक चिंतेत, आता २२ मे पर्यंत मुदत तिसऱ्यांदा मुदतवाढ

पिंपरी, ता. १३ ः ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. पुन्हा पंधरा दिवस वाढविल्याने पालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. यानंतर किमान मे महिन्यात तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, अशी आशा पालकांना होती. परंतु प्रत्यक्षात प्रवेशाची प्रक्रिया सुरु न झाल्याने आरटीई पात्रांची प्रवेश निश्चिती कधी करणार ? अशी विचारणा पालक करू लागले आहेत.

शहरातील स्वयंअर्थसहाय्यित, खासगी विनाअनुदानित आणि खासगी कायमविनाअनुदानित शाळांतील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण दिले जाते. या वर्गातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हा यामागे उद्देश आहे. यंदा आरटीई अंतर्गत शहरातील ३ हजारात २५० जागांसाठी प्रवेशांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. त्याची सोडत ५ एप्रिलला काढण्यात आली. एकतर एप्रिलमध्ये उशिरा लॉटरी काढण्यात आली आहे. तर १३ एप्रिलपासून बालकांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी सुरवात केली होती. त्यानुसार ५ मेपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत दिली होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच आरटीईचे पोर्टल बंद पडल्याने पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यात अडचणी उद्भवत होत्या. परिणामी आरटीई अंतर्गत प्रवेश घेता यावेत, यासाठी शिक्षण विभागाने ८ मेपर्यंत मुदत वाढवून दिली होती. त्यांस पुन्हा १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, अनेक बालकांचे प्रवेश अद्यापही निश्चित झाले नाहीत. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

तरच कागदपत्र ग्राह्य
या प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्‍चितीकरता २२ मेपर्यंतच्या वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावेत. तदनंतर या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाला सुरवात होणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com