
गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त -
----------
कन्स्ट्रक्शन साईटवरून लाखोंच्या साहित्याची चोरी
पिंपरी : बावधन येथील एका कन्स्ट्रक्शन साईटवरून चोरटयांनी २ लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. हि घटना गुरुवारी (ता. ११) रोजी माऊंट अक्सीस मुळशी रोड येथे घडली.
याप्रकरणी मनोज सावरमल मित्तल (वय ४४ रा.बोपोडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळी चार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरून चोरटयांनी २ लाख ८ हजार ५२ अल्युमिनियमच्या प्लेट चार चोरटयांनी चोरून नेल्या आहेत. हा प्रकार लक्षात आला असता फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी मित्तल यांनी काही जणांवर संशय व्यक्त केला असून हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
---
एटीएम कार्डच्या बहाण्याने जेष्ठाला २ लाखांचा गंडा
पिंपरी : एटीएम केंद्रातून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने कार्ड बदलून दोन भामट्यांनी जेष्ठ नागरिकाला दोन लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी गुरूवारी (ता. ११) दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी राहूल सुरेंदर शहा (वय २९ रा.दिघी) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार दिघी येथे २४ ते २५ डिसेंबर २०२२ रोजी घडला. फिर्यादी हे रत्नागिरी येथे फिरायला जातान त्यांनी त्यांचे एटीएम कार्ड वडिलांना दिले. यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांना पैसे निघाले नाहीत. त्यांनी दोन-तीन वेळा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. मदत करत असताना त्यांनी हातचालाखीने कार्डची आदलाबदल केली. पैसे निघत नाहीत कार्ड खराब आहे असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी दोन दिवसात फिर्यादीच्या खात्यावरून १ लाख ९९ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. त्यानुसार दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
---
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
- पत्नी जखमी
पिंपरी : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (ता.११) दुपारी चाकण शिक्रापूर रोडवरील शेलपिंपळगाव येथे घडला.
याप्रकरणी शिवाजी बंडू थोरवे (वय ५४ रा.शेलपिंपळगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार असून अवदेश कुमार अरुण वर्मा (रा. मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ६० वर्षीय भाऊ हे गुरूवारी दुपारी दुचाकीवरून पत्नीसह शेलपिंपळगाव येथे जात होते. दरम्यान; रास्ता ओलांडत असताना शिक्रापूर कडे जाणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिली. यात फिर्यादी यांच्या भावाचा मृत्यू झाला तर; त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या. यावरून कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.