टोल वाचवण्याच्या नादात सोमाटण्यात वादाचे प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोल वाचवण्याच्या नादात
सोमाटण्यात वादाचे प्रकार
टोल वाचवण्याच्या नादात सोमाटण्यात वादाचे प्रकार

टोल वाचवण्याच्या नादात सोमाटण्यात वादाचे प्रकार

sakal_logo
By

सोमाटणे, ता. १३ ः सोमाटणे टोलनाक्यावर टोल वाचवण्यासाठी लेनची शिस्त मोडून वाहने पुढे घुसवण्याच्या प्रकारातून वादाचे प्रमाण वाढले आहे.
सोमाटणे टोलनाका हटाव या मागणीसाठी कृती समितीने दोन महिन्यांपूर्वी केळेल्या आंदोलनानंतर सोमाटणे टोलनाक्याचा निर्णय होईपर्यंत मावळवासीयांच्या सर्व वाहनांसाठी टोलमध्ये सवलत देण्यात आली होती. या संधीचा फायदा मावळवासीयांपेक्षा अन्य वाहनचालकांनी घेण्याचा प्रकार सुरु झाला. यासाठी फ्री लेन असलेल्या शेवटच्या लेनमध्ये प्लॅस्टीक खांबाचा अडथळा तोडून, वाहने घुसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यातून गेल्या महिनाभरापासून टोलनाक्यावर किरकोळ अपघात वाढले असून, वाहनचालकात दररोजचे वादाचे, भांडणाचे व वाहने रस्त्यावर आडवी उभे करण्याचे प्रकार वाढलेत. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. महामार्ग पोलिसांनी तातडीने बेशिस्त वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी टोल भरणाऱ्या इतर वाहनचालकांनी केली
आहे.
फोटोओळी ः ४२६४५
-------------------------------------------------------------------------