एसटी कर्मचाऱ्यांना 
मिळेना बदली सुटी

एसटी कर्मचाऱ्यांना मिळेना बदली सुटी

पिंपरी, ता. १३ ः वल्लभनगर एसटी आगाराने उन्हाळी जादा हंगामातील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. आगार व्यवस्थापकांनी परिपत्रकात म्हटले आहे. कामगार दिनाची (एक मे) पगारी सुटी प्रत्येक कर्मचाऱ्यांना मागणीनुसार व प्रशासनाच्या सोईप्रमाणे देण्यात येईल, अशा एसटी व्‍यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बदली सुटी मिळावी, यासाठी शंभर जणांनी सामुहिक अर्ज केला होता. तो नामंजूर करण्यात आला आहे.
उन्हाळी हंगाम संपेपर्यंत सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. या हंगामात एसटीतील प्रवाशांची संख्या वाढते. नेमक्या याच कालावधीत महसूलवाढीचा प्रयत्न केला जातो. मात्र, पिंपरी चिंचवड आगारातील कर्मचाऱ्यांना एक मे रोजीची कामगार दिनानिमित्तची पगारी सुटी १९ मे २०२३ रोजी मिळावी, अशा आशयाचे पत्र शंभर कर्मचाऱ्यांनी एसटी आगार व्यवस्थापकांकडे दिले होते. परंतु आगारात सद्यःस्थितीत उन्हाळी जागा हंगाम सुरू असल्याने ही पगारी सुटी प्रत्येक कर्मचाऱ्यांस मागणीनुसार व प्रशासनाच्या सोईप्रमाणे देण्यात येईल, अशा सूचना व्यवस्थापकाने केल्या आहेत. त्यानुसार आगार व्यवस्थापकांनी शंभर जणांचा अर्ज नामंजूर केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी १९ मे रोजी चा रजेचा अर्ज प्रशासनाच्या रजा कोट्याप्रमाणे आगार व्‍यवस्थापक यांच्याकडून अगोदरच मंजूर करून घेतलेला आहे. त्यांची १९ मे रोजी रजा मंजूर समजण्यात यावी.

चालक व वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी यांनी १९ मे रोजी आपल्या नियोजित कर्तव्यात हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे, अन्यथा नियमानुसार प्रमादिय कारवाई हजर राहून प्रशासनास सहकार्य करावे, अशा आदेशानुसार कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना कर्मचारी जागृती अभियान राबवायचे होते. त्यामुळे त्यांनी रजेचा अर्ज केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com