झिरो शॅडो डे म्हणजेच शून्य सावली दिवस.

झिरो शॅडो डे म्हणजेच शून्य सावली दिवस.

पिंपरी चिंचवडकरांनी
अनुभवली शून्य सावली
------------------------------
पिंपरी, ता. १३ ः कुणी सोबत करो अथवा न करो; परंतु सावली अशी गोष्ट आहे, जी आयुष्याच्या शेवटपर्यंत मनुष्याची सोबत करत असते. मात्र, कधी कधी हीच विश्‍वसनीय सावली आपली साथ सोडते. तो दिवस म्हणजे शून्य सावली दिवस होय. हा अनोखा अनुभव पिंपरी चिंचवडकरांनी शनिवारी (ता. १३) दुपारी अनुभवला.
आयुष्यात सावली कधीच आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. परंतु, वर्षातून दोन दिवस असे येतात, ज्या दिवशी सावलीच साथ सोडते. काही क्षणापुरती का होईना सावली गायब होते. हा बिनसावलीचा दिवस शहरात शनिवारी (ता. १३) दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी अनुभवायला मिळाला. दुपारच्या सुमारास बच्चेकंपनीसह अनेकांनी घराबाहेर उन्हात उभे राहून शून्य सावलीचा अनुभव घेतला. शहरात जागोजागी हे चित्र पाहायला मिळाले. सूर्य डोक्‍यावर आल्यानंतर उन्हात उभे राहिलेल्या व्यक्तीची अथवा वस्तूची सावली थेट पायाखाली आल्याचे पाहायला मिळाले. काही मिनिटांसाठी सावली गायब झाली होती.


पुणे १३ मे १२.२९ वाजता
पिंपरी-चिंचवड १३ मे व १४ मे - १२.३१ वाजता

पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून, साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदयाची (किंवा सूर्यास्ताची) क्षितीजावरची जागा बदलत असते. २३ डिसेंबर ते २१ जून या काळात सूर्याचे उत्तरायण असते. तर त्यानंतर दक्षिणायन सुरु होते.

कोट
‘‘महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगवेगळे दिवस आणि वेळा असतात. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहवासीयांनी दुपारी १२.२० ते १२.३५ या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. जेणेकरुन शून्य सावली दिसू शकते. ’’
-सुनील पोटे, शिक्षण अधिकारी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क

फोटो ४२६४६, ४७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com