एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत
वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक
एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक

एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः अलापूझा (केरळ) येथे एशियन पॉवरलिफ्टिंग चॅंपियनशिप स्पर्धा झाली. त्यात ६९ किलो वजनी गटामध्ये वाकड येथील अक्षया शेडगे हिने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. स्क्यूट २२० किलो, बेंच प्रेस ११० किलो व डीडलिफ्ट २१२.५० किलो असे एकूण ५४२.५० किलो वजन उचलून अक्षयाने सुवर्णपदक मिळवले. स्पर्धेमध्ये भारतासह मंगोलिया, इरान, कझाकिस्तान, हाँगकाँग, इंडोनेशिया, चीन, फिलिफाइन, उझबेकिस्तान, ओमान या देशातील स्पर्धकांचा सहभाग होता.