
उद्यापासून वाहतुकीत बदल निगडी-सोमाटणे दरम्यान गुरुवारपर्यंत नियोजन
पिंपरी, ता. १४ ः जुना मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिर ते काळोखे पेट्रोल पंप सोमाटणे फाटा या दरम्यान रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) मंगळवारी (ता. १६) ते गुरुवारपर्यंत (ता. १८) अतिक्रमण विरोधी कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी या कालावधीत महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली.
महामार्गालगतचे अतिक्रमण काढताना वाहतूक नियमनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीत बदल केला जाणार आहे. हा बदल १६ ते १८ मे दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेसाठी असतील, असेही डोळे यांनी कळविले आहे.
असा असेल बदल
- किवळे पुलावरील बंगळूर ते मुंबईकडे जाणारी वाहने सेंट्रल चौक मार्गाऐवजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जातील
- सोमाटणे फाटा येथून सोमाटणे फाटा एक्झिट रोडने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुढे इच्छित स्थळी जातील
- जुना पुणे-मुंबई महामार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने भक्ती-शक्ती चौकातून मुकाई चौक, कृष्णा चौक मार्गे द्रुतगती मार्गाने मुंबई जातील
- पुणे ते सोमाटणे व तळेगाव दाभाडेकडे जाणारी वाहने निगडीमार्गे सेंट्रल चौक- गहुंजे शिरगावमार्गे सोमाटणे व तळेगाव इच्छित स्थळी
- बंगळूर महामार्गाने येणारी वाहने किवळे मार्गे कृष्णा चौक- गहुंजे- शिरगाव- सोमाटणेमार्गे मुंबईकडे वा इच्छित स्थळी जातील
दुचाकी व मोटारींसाठी
- मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ः वडगाव फाटा- तळेगाव स्टेशन चौक- माळवाडी- मंगलमूर्ती मेडिकल- भेगडेवाडी स्टेशन- घोरावडेश्वर मार्गे महामार्गाने
- पुण्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी ः सेंट्रल चौक- साईनगर- गहुंजे- शिरगाव मार्गे- सोमाटणे फाटा मार्गे पुढे
- उर्सेखिंड येथून येणारी वाहतूक वडगाव फाटा चौकातून उजवीकडे वळून पुण्याकडे जाणारा मार्ग व जुना महामार्गाने येणारी वाहतूक वडगाव फाटा चौकात बंद
- तळेगाव दाभाडे (लिंब फाटा) ते पुणे बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद
पर्यायी मार्ग
- तळेगाव-चाकण रस्त्याने पुण्याकडे जाणारी हलकी वाहने माळवाडी- घोरावाडी- देहूरोड मार्गे पुण्याकडे जातील
- तळेगाव- चाकण रस्त्याने पुण्याकडे जाणारी जड व अवजड वाहने देहूफाटा- येलवाडी- परंडवाल चौक- देहूगाव मार्गे जातील.