Mon, Sept 25, 2023

भोसरीत सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
भोसरीत सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात
Published on : 15 May 2023, 10:50 am
पिंपरी, ता. १५ ः भोसरी येथील न्यू संत तुकाराम पॅलेसमध्ये पिंपरी-चिंचवड शहर तेली समाजाच्यावतीने मोफत सर्व जातीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, शंकर जगताप, सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे, अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. या वेळी वधू-वरांना भेटवस्तू दिल्या, अशी माहिती अध्यक्ष शिवराज शेलार, सचिव पिराजी काळे यांनी दिली.