Tue, October 3, 2023

मुष्टियुद्ध स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंना ६ पदके
मुष्टियुद्ध स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या खेळाडूंना ६ पदके
Published on : 15 May 2023, 12:25 pm
पिंपरी, ता. १५ ः गुरूवर्य श्री संजीवनी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप घेण्यात आली. पुणे शहर संघटनेच्या मान्यतेने शुक्रवार पेठ मैदानावर मुष्टियुद्ध स्पर्धेत खेळांडूनी घसघशीत यश प्राप्त केले. विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे - सुवर्ण पदक- आर्यन सरतापे (वयोगट १४ ते १५, एच.ए.स्कूल), सुवर्ण पदक - वैभव साबळे वयोगट (१५-१८, डी. वाय.पाटील कॉलेज), रौप्य पदक- राखी घाडगे (वयोगट १७-१८, ए.एस.एम), रौप्य पदक - अनुराधा शिरगवे (वयोगट १९ च्या पुढे, एम.यु.सी.सी), रौप्य पदक - फवाद संगे (वयोगट १६ ते १७, वाय.पाटील कॉलेज), कास्य पदक - सोमनाथ कांबळे ( वयोगट १५ ते १६, एच.ए.स्कूल, पिंपरी).