शहरातील उद्योगांना पायाभूत 
सुविधा देण्यास कटिबद्ध

शहरातील उद्योगांना पायाभूत सुविधा देण्यास कटिबद्ध

पिंपरी, ता. १५ : ‘‘शहराच्या विकासामध्ये उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या सूचना, अडचणी जाणून घेणे, विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते. बदलत्या काळानुसार लघु आणि मध्यम उद्योजकांसमोरील आव्हाने वाढत आहेत. त्यांच्यासाठी रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका नेहमीच तत्पर आहे,’’ असे प्रतिपादन महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
महापालिका व स्मार्ट सिटी यांच्या ‘संवाद उद्योजकांशी’ या उपक्रमांतर्गत सिंह यांनी त्यांच्या दालनात शहरातील उद्योजकांशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त विनोद जळक, आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे, सीआयआयचे कार्यकारी अधिकारी ओंकार भोसेकर, एमसीसीआयएचे संचालक पराग कुलकर्णी, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संजय जगताप, उपाध्यक्ष जयंत कड, सचिव संजय सातव, प्रमोद राणे, संचालक भानुदास औटी, तातेराव आढे आदी उपस्थित होते. सेक्टर ७ व १० मधील उद्योगांना पुरेसा व सुरळीत पाणीपुरवठा करण्याविषयी निर्णय घेण्यात आला. दर तीन महिन्यांतून एकदा उद्योजकांशी संवाद साधण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे सिंह यांनी सांगितले. ओला व सुका कचरा वर्गीकरण व संकलन करणे, हानिकारक कचरा मोशी येथील प्रकल्पामध्ये पाठवणे, रस्त्यांचे रुंदीकरण करणे, काही भागांत पथदिव्यांची कमतरता दूर करणे, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे आणि झाडे पडणे या समस्यांवर योग्य कार्यवाही करणे, एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करणे अशा विषयांवर चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com