देहूत अवैध गुटखा, तंबाखू जप्त

देहूत अवैध गुटखा, तंबाखू जप्त

देहू, ता. १६ ः विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची विक्री करणाऱ्या टपरी चालकास देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला असा एकूण तेवीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. रविवारी (ता. १४) रोजी दुपारी दोनच्या सुमारास देहूतील वैकुंठस्थान जवळील पान टपरी येथे पोलिसांनी कारवाई केली. पोलिस कर्मचारी विजय दौंडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संतोष खरात (वय ४३, रा. देहू) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी हा आपल्या पानटपरीमध्ये शासन बंदी असलेला गुटखा अवैध रित्या विकत असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com