Thur, October 5, 2023

तळेगावात गटार तुंबल्याने
सांडपाणी रस्त्यावर
तळेगावात गटार तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर
Published on : 16 May 2023, 9:44 am
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १६ : येथील मारुती मंदिर चौकाच्या वळणावर मंगळवारी (ता. १६) भूमिगत गटार तुंबल्याने चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून रस्त्यावर पसरले होते. सर्वत्र सांडपाण्याची दुर्गंधी पसरली होती. वारंवार येथील गटार तुंबून रस्त्यावर पाणी पसरत असल्याने नागरिक व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथून वाहने जोरात जाताना गटाराचे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडाल्याने भांडणाचे प्रसंग उद्भवत आहेत. हे पाणी जिजामाता चौकापर्यंत वाहत होते. सकाळीच हॉटेल, दुकाने यांच्या दरवाजात पाणी पोचल्याने नागरिक संतप्त झाले होते. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने येथील तुंबलेल्या गटाराची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
PNE23T43210