
छत्रपती संभाजी महाराज जयंती संत तुकारामनगरमध्ये उत्साहात
पिंपरी, ता. १६ ः अखिल संत तुकारामनगर व धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. मर्दानी खेळ, ढोलताशा, लेझीम पथकासह भव्य-दिव्य मिरवणुकी काढण्यात आल्या.
प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी धर्मवीर संभाजी महाराज चौक, संत तुकारामनगर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सायंकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच ढोलताशा व लेझीम पथकांनी देखील मिरवणुकीची शोभा वाढवली.
या वेळी विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मुख्य आयोजक संतोष म्हात्रे व नीलम म्हात्रे, माजी नगरसेविका सुजाता पलांडे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमित भोसले, शिवसेनेचे विभाग प्रमुख दत्ताराम साळवी, अभिजित गोफण, भोला पाटील, पुरुषोत्तम वायकर, रोहित लोणारे, गणेश जाधव, युवा सेनेचे परवेज शेख, अमित फालके, वैशाली लागंडे, वनिता कांबळे, किरण अडागळे, डॉ. आरती राऊत आदी उपस्थित होते.