दिवाणी, सत्र न्यायालयासाठी पिंपरीत वकिलांचे चक्री उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाणी, सत्र न्यायालयासाठी
पिंपरीत वकिलांचे चक्री उपोषण
दिवाणी, सत्र न्यायालयासाठी पिंपरीत वकिलांचे चक्री उपोषण

दिवाणी, सत्र न्यायालयासाठी पिंपरीत वकिलांचे चक्री उपोषण

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः शहराची वाढती लोकसंख्या वाढत आहे. मोरवाडी पिंपरी येथील न्यायालयातील वाढत्या प्रकरणांची संख्या लक्षात घेता पिंपरी न्यायालयातील वकिलांची वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सत्र न्यायालयाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सत्र न्यायालय वकील कृती समितीने चक्री उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
शहराची लोकसंख्या अंदाजे वीस लाख इतकी आहे. त्यातुलनेत मोरवाडी पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सोळाशे वकील काम करीत आहेत. शहरात वर्षाला अंदाजे तीन हजार ते साडेतीन हजार गुन्हे दाखल होतात. त्यामुळे पिंपरी येथील न्यायालयात दिवसेंदिवस दाव्यांची संख्या वाढत आहे. वरिष्ठ दिवाणी व सत्र न्यायालयातील कामकाज करण्याकरिता वकील पक्षकार व पोलिस यांना शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पुणे येथे अनेक वर्षापासून जावे लागत आहे. मोरवाडी न्यायालयातील वाढत्या दाव्यांची संख्या लक्षात घेता पिंपरी न्यायालयातील वकिलांची वरिष्ठ दिवाणी न्यायालय व सत्र न्यायालयाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मोरवाडी पिंपरी येथील न्यायालयाचे स्थलांतर नेहरूनगर येथील नियोजित इमारतीमध्ये एकूण ११ न्यायालय तयार आहेत. तरीही मागणी अद्याप मान्य झालेली नाही. यासाठी चक्री उपोषणास बसलेले आहेत.