डॉ. संजाली वाढोकर यांना 
ऑप्थॅल्मिक हिरो पुरस्कार

डॉ. संजाली वाढोकर यांना ऑप्थॅल्मिक हिरो पुरस्कार

सोमाटणे, ता. १६ ः युरोपियन सोसायटी ऑफ कॅट्रॅक्ट अॅँड रिफेक्टिव सर्जरी इटली यांच्या वतीने नेत्र तज्ज्ञ डॉ. संजाली वाढोकर यांना आंतरराष्ट्रीय ऑप्थॅल्मिक हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या विविध देशाच्या प्रतिनिधींना युरोपियन सोसायटी ऑफ कॅट्रॅक्ट अॅँड रिफ्रेक्टिव सर्जरी रिसर्च इटली यांच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑप्थॅल्मिक हिरो अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलच्या डॉ. संजाली वाढोकर यांची निवड झाली. वितरण ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी कोची येथील आयोजित केलेल्या विशेष परिषदेत करण्यात आले.

नेत्र दोष व चष्म्याचे नंबर वाढत जाने याविषयी वाढोकर यांनी संशोधन केले. यावेळी युरोपियन सोसायटीच्या वतीने डॉ. संजाली वाढोकर यांना भविष्यात नेत्रचिकित्सा या क्षेत्रात नव्याने निर्माण होणारे आव्हाने आणि संधी या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते, त्यांनी हे मार्गदर्शन यशस्वी पूर्ण केले. पवना हॉस्पिटलच्या वतीने त्यांचे पती डॉ. प्रतीक वाढोकर, सासरे डॉ. सत्यजित वाढोकर, सासू डॉ. वर्षा वाढोकर अभिनंदन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com