जलतरण तलावात बुडून चिखलीत मुलाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलतरण तलावात बुडून
चिखलीत मुलाचा मृत्यू
जलतरण तलावात बुडून चिखलीत मुलाचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून चिखलीत मुलाचा मृत्यू

sakal_logo
By

पिंपरी, ता. १७ : पोहण्यासाठी जलतरण तलावात उतरलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी चारच्या सुमारास चिखली येथे घडली.
राहुल महंताप्पा वाघमोडे (वय- १७, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सूरज मल्लिकार्जुन वाघमोडे (रा. देहूरोड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जलतरण तलावातील जीवरक्षक आणि संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ राहुल हा चिखली येथील जलतरण तलावात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना तो पाण्यात बुडाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. जलतरण तलावावरील जीवरक्षक आणि तिथे नियंत्रण ठेवणाऱ्या इतर व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे
आपल्या चुलत भावाचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.