समावेशीत शिक्षणाचे तीनतेरा

समावेशीत शिक्षणाचे तीनतेरा

आशा साळवी ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ : समग्र शिक्षा समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत शहरातील‎ दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध भत्ते व सहायक साधनांच्या‎ खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.‎ मदतनीस भत्ता, प्रवासभत्ता यासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये भत्ता देण्याची तरतूद आहे. मात्र उशिरा मिळणाऱ्या निधीमुळे नियोजन कोलमडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
या दिव्यांग विद्यार्थ्यांना किमान आठवीपर्यंतचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या प्रक्रियेत दिव्यांग, बहुविकलांग, अस्थिव्यंग, पोलिओग्रस्त, कर्णबधिर, वाचादोष, मतिमंद, दृष्टिदोष, अंशतः दृष्टिहीन, पूर्ण दृष्टिहीन, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न अशा २१ विविध व्याधिग्रस्त मुलांच्या शिक्षण हक्काचा गांभीर्याने विचार करण्यात आला. २०२२-२०२३ शैक्षणिक वर्षात प्राथमिक व‎ माध्यमिक विभागासाठी निधी मागणीचा प्रस्ताव समग्र शिक्षा अभियानाकडे‎ पाठवला होता. शहरात प्राथमिक ते माध्यमिक सुमारे ६०१ दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना समग्र‎ शिक्षा समावेशीत शिक्षण प्रकल्पांतर्गत विविध सहायक‎ साहित्यासह सहा हजार प्रवास भत्ता दिला जातो. विद्यार्थ्यांना शाळेत‎ घेऊन येणाऱ्या पालक अथवा सहायकास मदतनीस भत्ता‎ सहा हजार रूपये देण्याची योजना आहे. परंतु, मंजूर निधी व त्या तुलनेत‎ वाढलेले प्रस्ताव यामुळे जिल्हास्तरावर समान वाटपाचे‎ धोरण घेतले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हाती उशीरा भत्ता असल्याचे समोर आले आहे.‎ समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना‎ शिक्षणाची समान संधी देऊन प्रोत्साहनासाठी अर्थसहाय्य‎ दिले जाते. परंतु, शासनाकडून‎ भत्यासाठी मंजूर प्रस्तावाच्या तुलनेत पाठवलेले प्रस्ताव‎ जास्त असल्याने विद्यार्थ्यांना‎ भत्ता उशीरा मिळाला. त्यामुळे सरकारी योजनेतील लाभाचा आकडा व‎ प्रत्यक्ष लाभ यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.‎ काही निधी अखर्चित राहिला आहे. त्यामुळे हा निधी माघारी जाणार‎ आहे. निधी उशिरा उपलब्ध होत‎ असल्याने योजनेच्या मूळ‎ उद्देशापर्यंत पोहोचण्यात अडथळे‎ निर्माण झाले आहेत.

‘‘समावेशीत शिक्षण उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध योजनेचा लाभ होतो. दिव्यांग विद्यार्थ्यांना भत्ता देण्यासाठी उपाय योजना केल्या आहेत.’’
- दत्तात्रेय खुटवड, समन्वयक, समावेशीत शिक्षण उपक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com