चिखलीतील रस्त्यावर
गाळ आणि राडारोडा

चिखलीतील रस्त्यावर गाळ आणि राडारोडा

पिंपरी, ता. १८ : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पावसाळी गटारे आणि पावसाळी वाहिन्यांची साफसफाई चिखली-जाधववाडी प्रभागात सुरू आहे. मात्र, तेथील प्रशस्त सेवा रस्त्यावर गाळ आणि राडारोडा ठेकेदारांकडून तसाच ठेवण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.
चिखली-जाधववाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण म्हणाले की, येथे जेसीबी लावून नाला, गटारे साफ केल्यानंतर सर्व दुर्गंधीयुक्त कचरा, सांडपाणी, राडारोडा पदपथावर लोटून ठेकेदार निघून गेले आहेत.
चिखली-जाधववाडी येथील सिल्व्हर सिटी, सिल्व्हर स्काइज या हौसिंग सोसायट्या व नागरी वसाहती असलेल्या या भागातील नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. महापालिकेने ठेकेदारावर कारवाई करावी व परिसर पुन्हा स्वच्छ करावा, अशी मागणी केली आहे.
फोटो ः 43681

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com