आवास योजनेची सोडत काढा ः लांडगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवास योजनेची 
सोडत काढा ः लांडगे
आवास योजनेची सोडत काढा ः लांडगे

आवास योजनेची सोडत काढा ः लांडगे

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजना’ हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आकुर्डी, पिंपरी आणि डुडूळगाव येथे गृहप्रकल्प उभारले आहेत. आकुर्डी व पिंपरीतील काम पूर्ण झाले असून अनुक्रमे ३७० व ५६८ सदनिका तयार आहेत. डुडूळगाव प्रकल्पात एक हजार १९० सदनिका उपलब्ध होणार आहेत. त्यांची उभारणी सुरू आहे. त्यामुळे दोन हजार १२८ सद--निकांसाठी सोडत प्रक्रिया राबवून लाभार्थी निश्चित करावेत, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांना केली आहे. यासाठी संगणक प्रणाली विकसित कराणे व लाभार्थींचे अर्ज मागवणे यासह अन्य कामकाजाचे नियोजन करण्याबाबत संबंधित विभागांना सांगावे, असेही त्यांनी सूचविले आहे.