छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी महापालिकेचे अनुदान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : वढू (बुद्रुक) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानस्थळी छत्रपतींचा पुण्यतिथी कार्यक्रम होतो. या ठिकाणी राज्यातील शिव-शंभूप्रेमी भेट देत असतात. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने दोन लाख ९९ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले.
आमदार महेश लांडगे यांनी काही महिन्यांपूर्वी महापालिकेकडे मागणी केली होती. प्रतिवर्षी फाल्गुन अमावस्येला संभाजी महाराजांचा बलिदान दिनाचा कार्यक्रम असतो. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. दरम्यान, महापालिका स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत याबाबत प्रस्ताव तयार करुन त्याला मंजुरी देण्यात आली होती.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुण्यतिथीदिनी समाधी स्थळाच्या ठिकाणी मंडप व लाइट व्यवस्था, पिण्याचे पाणी, हार-फुले यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रतिवर्षी देण्यात येणार आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते वढू (बु.) ग्रामस्थांना यावर्षीचा दोन लाख ९९ हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्रशासन अधिकारी विठ्ठल जोशी, ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.