पीसीसीओईआर कॉलेजला 
‘नॅक’चे ए++ मानांकन

पीसीसीओईआर कॉलेजला ‘नॅक’चे ए++ मानांकन

पिंपरी, ता. २३ ः पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाने (पीसीसीओईआर) अभियांत्रिकीच्या चारही विभागांचे नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडीटेशन (एन.बी. ए.) मानांकन पहिल्या फेरीत पटकावले.
राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद म्हणजेच ‘नॅक’चे परीक्षण महाविद्यालयाने यशस्वीरीत्या पूर्ण केले असून ए++ ही सर्वोच्च श्रेणी पुढील पाच वर्षांसाठी परीक्षणाच्या पहिल्याच फेरीत प्राप्त करून, नवा विक्रम नोंदवला आहे. ‘पीसीसीओईआर’मध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व कला-क्रीडा-साहित्य क्षेत्रातील प्रगती, त्यांच्यासाठी पुरविल्या गेलेल्या आवश्यक सोयी-सुविधा-संधी, विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर व्यावसायिक वाटचालीसाठी महाविद्यालयाचे योगदान, तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य, वर्तन आणि वृत्ती अशा गुणविशेषांवर महाविद्यालयाने घेतलेले परिश्रम, याची शहानिशा ‘नॅक’च्या शिक्षणतज्ज्ञ परीक्षकांनी केली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी ‘पीसीसीओईआर’ चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, रजिस्ट्रार प्रकाश येवले आणि ‘नॅक’चे समन्वयक डॉ. संतोष रणदिवे व डॉ. समीर सावरकर यांचे अभिनंदन केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, माजी मंत्री व विश्वस्त हर्षवर्धन पाटील व कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com