‘पुरवठा साखळी क्षेत्रात 
करिअरच्या संधी’

‘पुरवठा साखळी क्षेत्रात करिअरच्या संधी’

पिंपरी, ता. २३ ः ‘‘पुरवठा साखळीचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत असून जागतिकीकरणामुळे पुरवठा साखळी ही केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे कित्येक औद्योगिक संस्थांबाबत असे दिसून येते की, मालाची खरेदी एका देशात, उत्पादन दुसऱ्या देशात तर मार्केटिंग हे सर्व जगामध्ये. यामुळे पुरवठा साखळी व्यवस्थापन क्षेत्रात करिअरच्या नवनवीन संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत,’’ असे मत कॉर्पोरेट प्रशिक्षक डॉ. विराज अत्रे यांनी मांडले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या (आयआयएमएस) वतीने आयोजित ‘ऑपरेशन्स व सप्लाय चेन मॅनेजमेंट क्षेत्रातील संधी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, ‘‘ग्राहकाला एखाद्या वस्तू खरेदीसाठी आकारल्या जाणाऱ्या रक्कमेवर पुरवठा साखळी व्यवस्थापनावर झालेला खर्च हा मोठा परिणाम करणारा घटक आहे. या क्षेत्रात दर्जा नियंत्रण व सिक्स सिग्मा मधील संधीही उपलब्ध आहे.’’
पुरवठा साखळी व्यवस्थापनातील विविध स्तरातील बजावण्यात येणाऱ्या भूमिका व जबाबदाऱ्या याबद्दलही अत्रे यांनी विविध उदाहरणांसह सविस्तर विवेचन केले. पुरवठा साखळी योग्य पद्धतीने कशी अमलात आणावी, तिचे व्यवस्थापन कसे करावे व पुरवठा साखळीवर होणारा खर्च कमीतकमी कसा करावा, तसेच पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढवावी. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र झाले. प्रास्ताविक संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गंगाधर डुकरे यांनी केले. आभार प्रा. वैभव पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com