महापालिकेच्या ३८८ जागांसाठी ८५ हजार उमेदवारांचे अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या ३८८ जागांसाठी 
८५ हजार उमेदवारांचे अर्ज
महापालिकेच्या ३८८ जागांसाठी ८५ हजार उमेदवारांचे अर्ज

महापालिकेच्या ३८८ जागांसाठी ८५ हजार उमेदवारांचे अर्ज

sakal_logo
By

पिंपरी, ता.२३ ः पिंपरी चिंचवड महापालिका आस्थापनेवरील १५ संवर्गासाठी ३८८ पदे रिक्त आहेत. या पदांकरीता राज्यभरातून ८५,७७१ उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने सरळसेवा भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत

महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांसाठी गुरुवारपासून (ता. १८) परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहे. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ॲनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)) या पदांचा समावेश आहे. महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ‘ब’ व गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदांकरीता (ता. २६) रोजी एका सत्रामध्ये,‍ (ता. २७) रोजी तीन सत्रामध्ये व (ता. २८) रोजी तीन सत्रामध्ये परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्याकरीता राज्यामध्ये एकूण २६ शहरातील ९८ परीक्षाकेंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत.
महापालिका सरळसेवा भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने आयोजित केल्या जाणार असल्याने कुठल्याही आमिषाला वा गैरप्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पिंपरी ‍चिंचवड महापालिकेमार्फत प्रत्येक परीक्षाकेंद्रावर निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत.