‘गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले’
‘गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले’

‘गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २३ ः ‘‘ महात्मा गांधींच्या वाडमयांचा संपूर्ण अभ्यास करूनच वक्त्याने बोलले पाहिजे. महात्मा गांधींनी भारताला अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले ही गोष्ट संपूर्ण जगाला मार्गदर्शक झाली आहे.’’ असे प्रतिपादन महात्मा गांधी युवा अभ्यासक संकेत मुनोत यांनी केले. मोरवाडी येथे महात्मा गांधी व्याख्यानमालेत ‘महात्मा गांधींचा जागतिक प्रभाव’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी मुनोत यांच्या हस्ते महात्मा गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अरविंद देशपांडे यांनी साबरमती के संत तुने कर दिया कमाल हे गीत सादर केले. मुनोत म्हणाले, ‘‘ पूर्वी मी एक हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट ऐकली होती. त्यामध्ये एका आंधळ्याला हत्ती सापाप्रमाणे दुसऱ्याला खांबाप्रमाणे आणि इतरांना वेगवेगळ्या आहे असे वाटले. महात्मा गांधींच्या बाबत अनेक लोकांचा असाच गैरसमज होत आहे. जगाला आज युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे बुद्ध म्हणजे शांतता अहिंसा प्रेम करुणा म्हणूनच महात्मा गांधींचे विचार जगत वंद्य आहेत.’’ बी. आर. माडगूळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रज्ञा माडगुळकर यांनी परिचय करून दिला. यशवंत आपटे यांनी आभार मानले.