
विद्यार्थ्यांनी यशस्वी उद्योजक बनावे ः दप्तरदार
पिंपरी, ता. २३ ः ‘‘आपल्याकडे असलेले ज्ञान व भारत सरकार स्टार्टअप्स सारख्या सरकारी योजना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभारल्यास एक यशस्वी उद्योजक बनू शकतो.’’ असा विश्वास एमएसएमईचे सहायक संचालक अभय दप्तरदार यांनी व्यक्त केला.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च आकुर्डी, पुणे आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभय दप्तरदार बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाच्या डीन प्लेसमेंट जस्मीता कौर, उपप्राचार्य डॉ. सुनील डंभारे, कुलसचिव वाय. के. पाटील, माजी विद्यार्थी असोसिएशनच्या समन्वयक अमृता अदवंत उपस्थित होते.
या वेळी महाविद्यालयाचे देश-विदेशातील ५०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले मनोगत तसेच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने माजी विद्यार्थी मेळाव्याचा आनंद द्विगुणित झाला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमृता अदवंत यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. प्रिया चार्ल्स, प्रा. प्रतीक्षा शेवतेकर, डॉ. गणेश जाधव, डॉ. शैलेश घोडके, डॉ. प्रवीण गोर्डे, अमृता कुलकर्णी, संदेश सोले-पाटील, मोहिनी अवताडे, तेजश्री गुळवे आदींनी परिश्रम घेतले.