पिसाळ कुटुंबीयांना आमदार लांडगेंचा मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिसाळ कुटुंबीयांना आमदार लांडगेंचा मदतीचा हात
पिसाळ कुटुंबीयांना आमदार लांडगेंचा मदतीचा हात

पिसाळ कुटुंबीयांना आमदार लांडगेंचा मदतीचा हात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : मराठा बांधवांना संघटित करून, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभे करणारे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबीयांना भाजपचे शहराध्यक्ष,
आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे.
प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करून ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या माध्यमातून समाजातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा दिली. वैद्यकीय, रोजगार आणि व्यवसायात मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच अकाली निधन झाले. या पार्श्‍वभूमीवर आमदार लांडगे यांनी पिसाळ कुटुंबीयांच्या घरी भेट दिली व सांत्वन केले. तसेच, कर्तव्यनिधी म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ्रा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे प्रवीण पिसाळ यांच्या आईला अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वतः पाठपुरावा करीन आणि ज्या दिवशी ते साध्य होईल, ती प्रवीण पिसाळ व त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली असेल, असे लांडगे यांनी सांगितले.