महिला करदात्यांची सवलत पूर्ववत करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला करदात्यांची सवलत
पूर्ववत करण्याची मागणी
महिला करदात्यांची सवलत पूर्ववत करण्याची मागणी

महिला करदात्यांची सवलत पूर्ववत करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने मिळकत करामध्ये लादण्यात आलेले वाढीव ‘उपयोगिता शुल्क कर’ रद्द करावे व महिला मिळकत करदात्यास असलेली ५० टक्के असणारी सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर समितीच्यावतीने पुणे जिल्हाध्यक्ष सूरज गायकवाड यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
याबाबत ‘सकाळ’ने बुधवारी (ता. २४) वृत्त दिले होते. त्याचे पडसाद शहरात उमटले आहेत. गायकवाड यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या अन्यायकारक असणाऱ्या व गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लावणारा उपयोगिता शुल्काच्या नावाखाली मिळकत करामध्ये घरामागे लावण्यात आलेले १२६० रुपये रद्द करावे तसेच महापालिकेची पूर्वी असलेली महिला मिळकत करदात्यास ५० टक्के असणारी सवलत पूर्ववत करावी. आगाऊ रक्कम भरल्यास अगोदर १० टक्के सवलत मिळत होती. ती कमी करून ५ टक्के केली आहे, ती पूर्ववत १० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी आम्ही भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर समितीच्यावतीने केली आहे.
याची दखल घेऊन लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर समितीच्यावतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.