
ब्रिजभूषण यांच्या अटकेसाठी पिंपरीत धरणे आंदोलन
पिंपरी, ता. ८ : भाजपचे खासदार, कुस्तीगीर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ‘एफआयआर’ दाखल झाला असूनही, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आणि भारतीय कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने गुरुवारी (ता. ८) पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
ब्रिजभूषण सिंह यांना तत्काळ अटक झाली नाही तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी दिला. ब्रिजभूषण सिंह यांच्यानंतर कारवाई करण्याची मागणी पुणे जिल्हा महिला संघटिका शैला खंडागळे यांनी केली.
यावेळी खेळाडू राजू घुले, कैलास गायकवाड, राजाराम कुदळे उपस्थित होते. तसेच धनंजय आल्हाट, तुषार नवले, अशोक वाळके, कैलास नेवासकर, सचिन सानप, माधव मुळे, गुलाब गरुड, राम पात्रे, पांडुरंग पाटील, हाजी भाई मणियार, गोरख नवघने, नितीन घोलप, विशाल चव्हाण, वैभवी घोडके यांसह युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ः 47985