Wed, May 31, 2023

संत निरंकारी शिबिरात
३८३ जणांचे रक्तदान
संत निरंकारी शिबिरात ३८३ जणांचे रक्तदान
Published on : 27 March 2023, 1:09 am
काळेवाडी, ता. २७ ः संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर काळेवाडी येथील संत निरंकारी सत्संग भवनात झाले. त्यात ३८३ जणांनी रक्तदान केले. यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ससून रुग्णालय आणि संत निरंकारी रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संत निरंकारी सेवादलचे क्षेत्रीय संचालक किशनलाल अडवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनचे सेवादार व अनुयायी यांनी योगदान दिले. आभार गिरधारीलाल मतनानी यांनी मानले.