बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगारांना
 सुरक्षा संचाचे वाटप
बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप

बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : राज्य शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या ११० बांधकाम कामगारांना आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते नुकतेच सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणच्या कामगार नाक्यावरील बांधकाम कामगारांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले जात आहे.
या योजनेंतर्गत पिंपळे गुरवमध्ये आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या ११० बांधकाम कामगारांना सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या कार्याचा आणि जनकल्याणाचा वसा असाच पुढे सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार अश्विनी जगताप यांनी दिली.
यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, अमर आदियाल, राम वाकडकर, नीलेश जगताप आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
फोटो ः 33211