Mango
Mangosakal

Mango : पिंपरी-चिंचवड शहरात आंबा आवक कर्नाटक, आंध्र प्रदेशातून सर्वाधिक

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चौकाचौकात आणि फळ बाजारात आंबा विक्रीस आला आहे. बदामी व लालबागच्या आंब्याची कर्नाटक व आंध्र प्रदेशातून सर्वाधिक आवक झाली आहे.
Summary

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चौकाचौकात आणि फळ बाजारात आंबा विक्रीस आला आहे. बदामी व लालबागच्या आंब्याची कर्नाटक व आंध्र प्रदेशातून सर्वाधिक आवक झाली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चौकाचौकात आणि फळ बाजारात आंबा विक्रीस आला आहे. बदामी व लालबागच्या आंब्याची कर्नाटक व आंध्र प्रदेशातून सर्वाधिक आवक झाली आहे. रत्नागिरी व देवगड हापूस बाजारात असला तरी सर्वसामान्यांसाठी महागडा आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

देवगड प्रमाणेच रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग, देवबाग, खेड या ठिकाणी मिळणारे हापूस बाजारपेठेत येत आहेत. मात्र, हापूसच्या नावाखाली कमी प्रतीचा व इतर ठिकाणचा आंबा विकला जातो. कर्नाटकामधून येणारा आंबा हापूसप्रमाणे असल्याने नागरिकांची फसगत होते. व्यापाऱ्यांच्या मते दोन्ही जातीतील साली आणि चवीमध्ये मोठा फरक आहे. हापूस अद्याप सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसल्याने विक्री कमी प्रमाणात आहे. एप्रिल मध्यानंतर दर कमी होतील, असे विक्रेते सांगत आहेत. सध्या बदाम व लालबागची आवक जास्त असल्याने तुलनेत स्वस्त आहे. कर्नाटक व आंध्रमधून तो आला आहे.

Mango
MP Girish Bapat Passes Away: टाटा कंपनीचे ऋण फेडण्याचे काम बापट यांनी केले

बाजारपेठेतील बुधवारचे दर

  • देवगड हापूस : १२०० ते १५०० रुपये डझन

  • बदाम व लालबाग : १०० ते १२० रुपये किलो

  • केशर : १४० रुपये किलो

  • पायरी : १०० रुपये किलो

  • रत्नागिरी : २५०० ते ३००० रुपये, ५ डझनची पेटी

आवक भरपूर वाढल्यानंतर १५ दिवसांत काही प्रमाणात आंबा स्वस्त होइल. हवामानाचाही अधिक परिणाम आंब्यावर झाला आहे. मार्चपासून जुलैपर्यंत बाजारात आंबा राहील. एक दिवस घरी पाण्यात ठेवून नंतर खावेत. कृत्रिमरीत्या पिकविलेल्या फळाला अधिक चकाकी असते. त्याला चव देखील नसते. सुरकुतलेला आंबा खाण्यास उत्तम व रसदार आणि गोड आहे.

- गणेश खोसे, आंबा विक्रेता, पिंपरी

Mango
Womens Dikshant Sohala : तिसाव्या सत्रातील महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा लोणावळ्यात दिक्षांत सोहळा

अस्सल हापूस असा ओळखा

- साल कमी जाडीची व पातळ

- कापल्यानंतर केसरी गडद रंग

- इतर हापूस फिक्कट रंगाचे

- पिकलेला आंबा सामान्यतः पिवळा आणि हलक्या पीच रंगाचा

- देवगडची कोय छोटी व गर जास्त

- रत्नागिरी हापूसची कोय मोठी आणि गर कमी

- रेषा फार मोठ्या नसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com