महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या १९ जागांसाठी ८८ उमेदवारी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या
१९ जागांसाठी ८८ उमेदवारी अर्ज
महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या १९ जागांसाठी ८८ उमेदवारी अर्ज

महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या १९ जागांसाठी ८८ उमेदवारी अर्ज

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होईल. १९ जागांसाठी ८८ अर्ज आले असून उमेदवारी माघारीसाठी गुरुवारी (ता. ३०) शेवटचा दिवस आहे. सोमवारी (ता. ३) चिन्ह वाटप केले जाणार आहे, त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या आठ हजारावर आहे. त्यातील महापालिका सेवेतील अधिकारी, कर्मचारी पतसंस्थेचे सभासद आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांसह विविध १९ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. अन्य १४ जागा सर्वसाधारण अर्थात खुल्या आहेत. सर्व जागांसाठी ८८ उमेदवारी अर्ज आले आहेत. त्यांची छाननी झाली असून गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. बुधवारी दुपारपर्यंत केवळ एका उमेदवाराने माघार घेतली होती. ११ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज राऊत यांनी सांगितले.