एच३ एन२, कोरोना संसर्ग वाढतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एच३ एन२, कोरोना संसर्ग वाढतोय
एच३ एन२, कोरोना संसर्ग वाढतोय

एच३ एन२, कोरोना संसर्ग वाढतोय

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ ः शहरात इन्फ्लूएंझा एच३ एन२ सह कोरोना संसर्गही वाढू लागला आहे. या महिन्यात एच३ एन२ चे नऊ रुग्ण सापडले आहेत. शहराबाहेरील दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, कोरोनाचे २५५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळले आहेत. एच३ एन२चा संसर्ग झालेल्या दोन ज्येष्ठांचा मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांना अन्य विकारही होते, असे महापालिका आरोग्य व वैद्यकीय विभागाने कळविले आहे. सद्यःस्थितीत कोरोनाचे ११९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण संख्येत किंचित वाढ आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.